निस्वार्थ धार्मिक व सामाजिक कार्याबद्दल सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जय भवानी शंकर मठाचे जेष्ठ सेवेकरी रामचंद्र नामदेव डोंगरे (मामा) यांना राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी गुरुवर्य शंकरचरण, केडगाव मठाधिपती अशोक महाराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला सागर जाधव, सुरज वाघ, ओंकार रासकर, जयदिप होले, आकाश करवे, सिद्धेश पलंगे, गणेश कुंभार, प्रथमेश कुंभार, अनुज कुंभार, अविष्कार हिरवे, विनय बायस, नंदकुमार बायस, प्रकाश कुंभार, दिपक लोखंडे, राजु सस्ते, सागर घोलप यांसारखे अनेक सेवेकरी उपस्थित होते.
रामचंद्र डोंगरे (मामा) यांनी दौंड येथील सद्गुरु शंकर शेठ भवानी मठाच्या माध्यमातून धार्मिक कार्य करत आहे. त्यांनी विविध धार्मिक कार्यक्रम, भक्तांसाठी सेवा तसेच समाजहिताचे उपक्रम राबवून समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे.
अहिल्यानगर परिसरातही त्यांचा धार्मिक सेवेसोबतच सामाजिक कार्यात सहभाग असतो. त्यांच्या या निस्वार्थी कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.