• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

भाऊसाहेब फिरोदियाचे 41 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत

ByMirror

Jul 12, 2025
शाळेच्या वतीने गुणवंतांचा सन्मान

शाळेच्या वतीने गुणवंतांचा सन्मान

नगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शष्यवृत्ती (इयत्ता 8 वी) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. इयत्ता 5 वीचे 25 विद्यार्थी तर इयत्ता 8 वीचे 16 विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले.


विद्यार्थ्यांनी शाळेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा या वर्षीही कायम राखली असून, या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, उपमुख्याध्यापक कैलास साबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब वाव्हळ, वैभव कुलकर्णी आदींसह मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता 5 वी) परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत वेदांत दैठणकर, विराज गाढे, शिवराज म्हस्के, धीरज गुंड, शौर्य जठार, वेदांत भोत, कार्तिकी हारके, प्रज्वल सत्रे, श्रद्धा पालवे, तेजस्विनी मोरे, नंदनी पवार, साबिरअली तांबोळी, नेत्रा देशमुख, युवराज पाटोळे, अक्षरा तुंगीकर, सोहम ससे, विराज चोथे, श्रेया सायकवाड, आर्यन सत्रे, पार्थ ढोले, विराज शेलार, आरव मोरे, गौतमी भिंगारदिवे, वरदराज रोडे, आयुष लयशेट्टी यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना वैशाली मेहेर, बाळासाहेब पालवे, अतुल बोरुडे, शितल डिमळे, अपर्णा कमलकर, मीनाताई साबळे, सविता जासूद, मंजुषा शिवगुंडे यांचे मार्गदर्शन लाभले.


पूर्व माध्यमिक शष्यवृत्ती (इयत्ता 8 वी) परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आदित्य धस, शंतनु घोडके, सोहन शिंदे, संस्कृती पांडुळे, मनस्वी लवटे, ज्ञानेश्‍वरी गावडे, आयुष बोरुडे, अनुष्का भनभने, आकाश शेलार, अथर्व पैठणकर, कार्तिक गुंड, राजलक्ष्मी घडेकर, कार्तिकी शेळके, अक्षरा फुलसौंदर, दिव्या पटवा, संस्कृती आनंदकर यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना प्रगती बेगडे, अतुलकुमार पटवा, राजलक्ष्मी कुलकर्णी, शिल्पा नगरकर, सुलभा कुलकर्णी, अंजली गोले, सुषमा मुदगल, वैभव पडोळे यांचे मार्गदर्शन लाभले.


छायाताई फिरोदिया यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन गुणवत्ता टिकवून भवितव्य घडविण्याचे सांगितले. संस्थेचे सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *