साहित्यिक व शैक्षणिक कार्याचा गौरव
नगर (प्रतिनिधी)- अल-मुस्तफा अकॅडमी फॉर कल्चरल ॲण्ड लिटरेचर या संस्थेतर्फे साहित्यिक व शैक्षणिक कामाबद्दल मुनव्वर हुसैन छोटे खान यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. जकरीया आडीटोरीयम हॉल, अंजुमन-ए-इस्लाम कॅम्पस, सी.एस.टी. मुंबई येथे झालेल्या या पुरस्कार प्रदान सोहळ्यात मुनव्वर हुसैन यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. जहीर काझी, खतीब-ए-कोकण अली एम. शम्सी, गव्हर्नमेंट पी.जी. कॉलेज बीकानेरचे प्राचार्य प्रोफेसर मोहम्मद हुसैन, मीरठचे प्रोफेसर अस्लम जमशेदपुरी, अमरावतीचे डॉ. अकील अहमद, मुंबईचे असलम गाझी, हैद्राबादचे एफ.एम. सलीम, इक्बाल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. तबस्सुम नाडकर, मनजूर नाडकर, मुशीर अन्सारी, डॉ. सलीम, सहारनपूरचे तलत सरोहा, उर्दू कारवाँचे अध्यक्ष फरीद खान, शोएब इब्जी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुनव्वर हुसैन शहरातील प्रसिध्द सुफी उर्दू कवी हिम्मत अहमदनगरी यांचे नातू आहेत. मुनव्वर हुसैन स्वतः एक चांगले उर्दू कवी असून, ते अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्यूनिअर कॉलेज मध्ये कार्यरत आहेत. मुनव्वर हुसेन इदारा अदबे इस्लामी अहमदनगरचे अध्यक्ष आणि इक्बाल एज्युकेशन सोसायटी मुंबईचे उपाध्यक्ष आहे. त्यांना पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.