बत्तिन यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या स्मृतींना उजाळा
गुरुवर्य बत्तिन यांनी पद्मशाली समाजाला संघटित करुन शिक्षणाने दिशा दिली -प्रा.वीरभद्र बत्तीन
नगर (प्रतिनिधी)- पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. गुरुवर्य बत्तिन यांची 137 वी जयंती शहराच्या गांधी मैदान येथील प्रा. बत्तिन पोट्यन्ना प्राथमिक विद्यालयात साजरी करण्यात आली. कै. प्रा.बत्तिन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
प्रा. बत्तिन पोट्यन्ना यांचे नातू प्रा.वीरभद्र बत्तीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठानचे कार्यवाहक ज्ञानेश्वर मंगलाराम, सचिव प्राध्यापक बाळकृष्ण गोटीपामुल, कुमार आडेप, शंकरराव नक्का, शिवाजीराव संदुपटला, सहसचिव सविताताई कोटा, विश्वस्त व शालेय समिती अध्यक्ष राजेंद्र म्याना, मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा.वीरभद्र बत्तीन म्हणाले की, कै. गुरुवर्य बत्तिन यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाने समाजाची प्रगती साधली गेली. पद्मशाली समाजाला संघटित करुन जागृत केले. आजही समाजातील युवक-युवतींना प्रगतीसाठी उच्च शिक्षित होवून पुढे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, कै. गुरुवर्य बत्तिन यांचे कर्तृत्व व विचार आजही समाजाला दिशादर्शक आहे. कै. गुरुवर्य बत्तिन यांनी समाजसेवचे व्रत घेऊन शिक्षणाने समाजाला प्रकाशवाट दाखवली. त्यांच्या योगदानातून शहरात सक्षमपणे पद्मशाली समाज उभा राहिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शालेय विद्यार्थी भक्ती साळुंखे, त्रिवेद अमृतवाड, लावण्या पेंटेवार यांनी कै. गुरुवर्य बत्तिन यांच्या जीवनावर भाषणे केली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षक रावसाहेब इंगळे, शोभा बडगु, अनंता गाली, रत्ना रच्चा, पुष्पा म्याकल यांनी परिश्रम घेतले.