स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने सन्मान
नगर (प्रतिनिधी)- स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रतीक्षा सोनवणे यांना आदर्श सूत्रसंचालन पुरस्काराने गौरविण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सोनवणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शहरात झालेल्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, शिल्पकार प्रमोद कांबळे, अमित खामकर, स्नेहबंधचे संस्थापक डॉ. उद्धव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतीक्षा सोनवणे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य आदी विविध क्षेत्रात उत्कृष्ट पध्दतीने सूत्रसंचालन करत आहे. अनेक मोठ्या कार्यक्रमात त्यांनी सूत्रसंचलनाची भूमिका उत्तमपणे पार पाडली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श सूत्रसंचालन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.