युवकांना दिशा व मुलांवर संस्कार रुजविणारी चळवळ -संजय सपकाळ
वाचन संस्कृतीतून सांस्कृतिक जागृतीचा नवा अध्याय
नगर (प्रतिनिधी)- तेजज्ञान फाउंडेशनच्या वतीने साकारण्यात आलेल्या ग्रंथ रथ या अभिनव उपक्रमाचे भिंगार शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. वाचन संस्कृती रुजविण्याबरोबरच समाजात सकारात्मक विचारांची प्रेरणा देणारा हा ग्रंथ रथाचे हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
तेजज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली हॅपी थॉट्स ही वैचारिक व प्रेरणादायी पुस्तके, विविध विषयांवरील ग्रंथसंपदा, तसेच महापुरुषांची चरित्रे यांचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. संपूर्ण भिंगार शहरात हा ग्रंथ रथ सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध करुन देत आहे.
तेजज्ञान फाउंडेशनच्या ग्रंथ रथाच्या उद्घाटनाप्रसंगी सुनील (भाऊ) कर्डिले, वसंत राठोड, रावसाहेब कोकणे, चंद्रशेखर देशपांडे, कृष्णन नायर, केशव कराळे, रुक्मिणी नायर, रमेश वराडे, सुभाषराव सोनवणे, हेमंत खरे, गोरक्ष दळवी, विजय कांबळे, किरण धाडगे, सुनील बिदे, राजेंद्र सांगळे, सुभाष दिघे, किरण शिंदे, चंद्रशेखर देशपांडे, हेमंतकुमार बोरसे आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, तेजज्ञान फाउंडेशनने वाचन संस्कृती रुजवित आहे. युवकांना दिशा व मुलांना संस्कार रुजविण्यासाठी हॅपी थॉट्स बरोबर महापुरुषांचे विचारांवर असलेली पुस्तके नवीन पिढीला दिशादर्शक ठरणार आहे. मोबाईल मध्ये गुंतलेल्या पिढीला दिशा देण्यासाठी आणि वाचन संस्कृती रुजविणारी ज्ञानप्रसाराची ही चळवळ प्रेरणादायी आहे. तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांनी पुणे येथून सुरू केलेली ही चळवळ भारतासह विदेशात विस्तारली गेल्याचे त्यांनी सांगितले.
तेजज्ञान फाउंडेशन मागील 25 वर्षापासून हॅपी थॉट्सच्या ग्रंथांचा प्रचार-प्रसार करत आहे. पुस्तक प्रदर्शनाबरोबरच रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व सामाजिक विषयावर जनजागृती केली जात आहे. वाचन संस्कृतीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, शारीरिक, अध्यात्मिक व मानसिक क्रांती घडविण्याचे कार्य सुरु आहे. भारतात 450 सेंटर तर विदेशात 25 सेंटर आहेत. हॅपी थॉट्सची 400 च्यावर पुस्तके सात भाषांमध्ये प्रकाशित झालेली असून, जगभर त्याला मागणी असल्याची माहिती फाऊंडेशनच्या समन्वयकांनी दिली.