पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वागत करुन केला सत्कार
नगर (प्रतिनिधी)- सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा कामगार नेते रावसाहेब शंकर काळे यांनी शिवसेनेत (शिंदे गट) कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. शहरात नुकताच झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात राज्याचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री तथा संपर्क मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे पक्षात स्वागत करुन सत्कार केला.
यावेळी आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबूशेठ टायरवाले, शहर प्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, दिलीप सातपुते, कमलाकर कोते, नितीन औताडे, नगर तालुका प्रमुख अजित दळवी, रामदास भोर, मनोहर पोटे, नंदकुमार ताडे, सागर बेग, माजी महापौर शिलाताई शिंदे, सुरेखा कदम, रोहिणीताई शेंडगे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे, अनुसूचित जाती विभागाचे दक्षिण जिल्हाप्रमुख सुभाष आल्हाट आदी उपस्थित होते.
रावसाहेब काळे सह्याद्री छावा संघटना व धडक जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात कार्यरत आहे.
सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे. कामगारांच्या न्याय, हक्कासाठी त्यांचा लढा सुरु आहे. जिल्ह्यात गाव तेथे शाखा सुरु करण्याचा संकल्प काळे यांनी व्यक्त केला असून, कामगारांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकविण्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.