• Sun. Jul 20th, 2025

योग प्रशिक्षक अक्षय पावडे व पुनम बेलसरे योगासन पंच परीक्षा उत्तीर्ण

ByMirror

May 30, 2025

शालेय विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे देऊन योगाचा प्रचार-प्रसार

नगर (प्रतिनिधी)- बृहन महाराष्ट्र योग परिषद व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (अमरावती) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या योगासन या क्रीडा प्रकाराच्या पंच परीक्षेत शहरातील श्री रामावतार मानधना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एम.एम.वाय.टी.सी. क्लबचे योग प्रशिक्षक अक्षय पावडे व पुनम बेलसरे हे उत्तीर्ण झाले.


चिखलदरा येथे सदर योगासन पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही प्रशिक्षक गेल्या दोन वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या माध्यमातून योगाचा प्रचार प्रसार सुरु आहे.

प्रशिक्षकांनी मिळवलेल्या यशाबद्दल ट्रस्टचे विश्‍वस्त मोहनशेठ मानधना यांनी अभिनंदन केले. क्लबचे प्रशिक्षक उमेश झोटिंग, प्रणिता तरोटे, आप्पा लाढाणे, अक्षता गुंड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पावडे व बेलसरे प्रशिक्षणाचे कार्य करत आहे. त्यांच्या या यशाबद्दल क्लबच्या सर्व खेळाडूंनी तसेच पालकांनी देखील अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *