• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने निषेध

ByMirror

May 15, 2025
सत्तेचा अयोग्य तिलक लोकभज्ञाक मूल्यांशी विसंगत -ॲड. कारभारी गवळी

ऑपरेशन दगड भेजा शेंदूरच्या माध्यमातून केला धिक्कार; मंत्री पदाचा राजीनामा घेण्याची मागणी


सत्तेचा अयोग्य तिलक लोकभज्ञाक मूल्यांशी विसंगत -ॲड. कारभारी गवळी

नगर (प्रतिनिधी)- भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्यप्रदेशचे आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री विजय शाह यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. तर या मंत्राचा ऑपरेशन दगड भेजा शेंदूर या प्रतीकात्मक संज्ञेद्वारे संतप्त प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे.


लोकभज्ञाक तत्वज्ञानापासून दूर गेलेले नेतृत्व समाजासाठी घातक आहे. दगड भेजा म्हणजे जड, अचेतन व विवेकशून्य मन, तर शेंदूर हा सत्तेचा अयोग्य तिलक दर्शवतो. देशात अशा मंत्र्यांची मानसिकता समाजात दुफळी व खऱ्या देशभक्ती प्रेरित असलेल्या नागरिकांसाठी घातक आहे. या मंत्र्याच्या नेमणुकीवर टीका करुन, अशा व्यक्तींना नैतिकता, समज किंवा लोकाभिमुखतेचे भान नसतानाही सत्ता दिली जाते, ही लोकशाही मूल्यांची विटंबना असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


संबंधित मंत्री यांचे वर्तन हे लोकभद्न्यक मूल्यांशी सुसंगत नाही. त्यांच्या विधानातून स्त्रीद्वेष, अज्ञान आणि सामजिक असंवेदनशीलता झळकते. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे मंत्री केवळ राजकीय समीकरणांमुळे सत्तेवर आले असून त्यांच्या नेतृत्वात लोकशक्ती, ज्ञानशीलता व नैतिक मूल्यांचा अभाव असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.


मंत्री विजय शाह यांनी तात्काळ सार्वजनिक माफी मागावी आणि पदाचा राजीनामा द्यावा, मंत्रीपदाच्या नैतिक, मानसिक आणि लोकाभिमुख पात्रतेचे स्वतंत्र मूल्यांकन व्हावे, देशातील नेतृत्व हे लोकभज्ञाक शुद्धतेच्या निकषांवर निवडले जावे, कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासारख्या राष्ट्रसेवकांचा सन्मान आणि संरक्षण ही शासनाची जबाबदारी मानावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *