रोगराई टाळण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश
ग्रामस्थांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेची जागृती निर्माण झाल्यास रोगराईला आळा बसणार – पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील अमरधाम परिसरात निमगाव वाघा ग्रामपंचायत, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानात हातात झाडू घेऊन ग्रामपंचायत अधिकारी गोवर्धन राठोड, उपसरपंच किरण जाधव, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, संजय कापसे, अजय ठाणगे, दिपक जाधव, नवनाथ फलके आदींसह ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या. या स्वच्छता अभियानातंर्गत अमरधाम परिसरातील झाडांचा पाला-पाचोळा, कचरा उचळून परिसराची सफाई करण्यात आली.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, सार्वजनिक स्वच्छतेतून आरोग्य चळवळ बळकट होणार आहे. अस्वच्छतेने रोगराई पसरत असल्याने आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची असून, संस्थेच्या माध्यमातून वर्षभर स्वच्छतेचे उपक्रम घेण्यात येतात. ग्रामस्थांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेची जागृती निर्माण झाल्यास रोगराईला आळा बसणार असल्याचे स्पष्ट केले. या उपक्रमास सरपंच लताबाई फलके, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, भाऊराव वीर, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे आदींचे मार्गदर्शन लाभले.