युवकांसह परिसरातील नागरिकांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान
नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबईतील कामोठे येथे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात युवकांसह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. मुंबईस्थित पारनेरकरांनी या शिबिरात मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
साई ब्लड बँकेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात प्रतिष्ठानच्या वतीने 200 रक्तांच्या पिशव्या संकलित करण्यात आले. यावेळी रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. खासदार लंके यांच्या समर्थकांनी रक्तदान करुन समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.
