• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

मराठी साहित्य मंडळाच्या नगर तालुका अध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची नियुक्ती

ByMirror

Feb 23, 2025
मराठी साहित्य मंडळाच्या नगर तालुका अध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची नियुक्ती

नवोदित साहित्यिक व कवींना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार राहणार -डोंगरे

नगर (प्रतिनिधी)- मराठी साहित्य मंडळाच्या नगर तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी डोंगरे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुदर्शन धस उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे यांचे साहित्य क्षेत्रात सुरु असलेले कार्य आणि सातत्याने कवी संमेलन घेऊन नवोदित कवी, साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. त्यांच्या काव्य संमेलनात अनेक कवी व लेखकांचे काव्यसंग्रह व कथासंग्रह देखील प्रकाशित झालेले आहेत. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून कार्य करत आहे. या कार्याची दखल घेऊन डोंगरे यांची मराठी साहित्य मंडळाच्या नगर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी विविध क्षेत्रात कार्य करणारे पै. नाना डोंगरे मराठी साहित्य मंडळाच्या उद्देशाने साहित्य क्षेत्राला चालना देण्याचे काम करणार असल्याची भावना व्यक्त करुन त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. पै. नाना डोंगरे यांनी साहित्य चळवळ बळकट करण्यासाठी व मराठी साहित्य मंडळाच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार राहणार असल्याचे यावेळी सांगितले.


डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष ललिता गवांदे, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. घनश्‍याम पांचाळ आदींसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *