• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात बुधवारी रंगणार आठवे काव्य संमेलन

ByMirror

Feb 17, 2025
निमगाव वाघात बुधवारी रंगणार आठवे काव्य संमेलन

खासदार लंके यांची राहणार प्रमुख उपस्थिती; शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज जयंतीचा उपक्रम

नगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे बुधवारी (दि.19 फेब्रुवारी) आठवे काव्य संमेलन रंगणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन खासदार निलेश लंके यांच्या हस्ते होणार असून, कवी व रसिकप्रेमींना या काव्य संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. काव्य संमेलनाच्या निमंत्रणाचे पत्र खासदार लंके यांना देण्यात आले. गावातील परिवार मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाला प्रारंभ होणार असून, जयंती उत्सवानिमित्त पोवाडे व अभंगाचा कार्यक्रम देखील रंगणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.


या कार्यक्रमात विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या काव्य संमेलनात नवोदित कवी व नामवंत कवींचा सहभाग असणार आहे. तसेच यावेळी साहित्यिका प्रा. लीला जंजीरे लिखित भाकरी या काव्य संग्रहाचे प्रकाशन होणार आहे. साहित्यिक तथा प्रवचनकार प्रा. संपत गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या काव्य संमेलनाप्रसंगी अनाथांची माय ह.भ.प. संगीताताई गुंजाळ, सिने कलाकार मोहनीराज गटणे, गझलकार रज्जाक शेख, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, प्रा. गणेश भगत, स्वाती आहिरे, गिताराम नरवडे, आनंदा साळवे आदी उपस्थित राहणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *