• Wed. Jul 2nd, 2025

शिवनेरी चौकात शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन

ByMirror

Feb 10, 2025

कार्यकर्त्यांना सर्वसामान्यांना आधार देण्याचे आवाहन

शिवसेनेची शाखा हे जनसेवेचे मंदिर ठरणार -अनिल शिंदे

नगर (प्रतिनिधी)- राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देऊन, गोरगरिबांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी शिवसेना समाजात कार्य करत आहे. शिवसेनेची शाखा हे जनसेवेचे मंदिर ठरणार आहे. शहरातील प्रत्येक शिवसेनेच्या शाखेत गोरगरीब व वंचितांची प्रश्‍न सोडविण्याचे काम केले जाणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केले.
रेल्वे स्टेशन रोडवरील शिवनेरी चौकात शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिंदे बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, संभाजीराजे कदम, दत्ता कावरे, संतोष ग्यानप्पा, विशाल खैरे, सतीश खैरे, सचिन शिंदे, सुनील लालबोंद्रे, वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्क प्रमुख ओमकार शिंदे, आकाश कातोरे, अल्पसंख्यांक विभाग प्रमुख हनिफ पटेल, संजय वाकचौरे, रोहित लोखंडे, प्रल्हाद जोशी, आनंदराव शेळके, रवींद्र लालबोंद्रे, सुनील भिंगारदिवे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे शिंदे म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला आधार देण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कल्याणकारी योजना राबविल्या, तर उपमुख्यमंत्री असताना देखील जनेतेच्या कल्याणासाठी कार्य करत आहे. सर्वसामान्य जनता त्यांच्या कार्यशैलीने प्रभावीत झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सचिन जाधव यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात शिवसेनेची शाखा सुरू करून शिवसेनेची ताकद वाढविण्याचे काम केले जाणार आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समोर ठेवून युवकांना सामाजिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. या शाखेच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा ठसा उमटवून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यात येणार आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


संभाजीराजे कदम म्हणाले की, घराघरात कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा विचार घेऊन शिवसेना कार्य करत आहे. सातत्याने शाखेच्या माध्यमातून शिवसैनिक घडत आहे. शाखेच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी नमूद केले.


दिलीप सातपुते म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या कार्यकाळात मोठे कार्य त्यांनी उभे केले. महाराष्ट्राच्या विकासाला त्यांनी चालना दिली असून, विकासाचा अजेंडा घेऊन शिवसेना शहरात कार्य करणार असल्याचे सांगितले.


शिवसेनेचे उपशहर प्रमुख सुनील भिंगारदिवे यांच्या पुढाकाराने या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाखेचे अध्यक्ष राहुल वाकचौरे, उपाध्यक्ष सागर जंगम, सदस्य अंकुश सकट, दिनेश ठोकळ, सचिन ठोकळ, आनंद गुजर, संदीप साळवे, गणेश बोरुडे, किरण कदम, युनूस शेख, प्रवीण कांबळे, विजय गायकवाड, शहाजी पातारे, वसीम पटेल, मनोज वाकचौरे, प्रमोद कांबळे, प्रदीप भिडे, सुनील लांडगे, राकेश कदम, शरद वाकचौरे, नितीन पोते, विठ्ठल पारधे यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाखेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवून त्यांना आधार देण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *