• Wed. Feb 5th, 2025

शिवसेनेच्या वतीने स्व. आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

ByMirror

Jan 27, 2025

स्व. आनंद दिघे यांनी शिवसैनिकांना वाघाप्रमाणे जगायला शिकवले -सचिन जाधव

नगर (प्रतिनिधी)- शहरात शिवसेनेच्या वतीने स्व. आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. मंगलगेट येथील शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालयात स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. आनंद दिघे अमर रहे…च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.


याप्रसंगी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, शहर प्रमुख सचिन जाधव, आनंदराव शेळके, सुनील लालबोंद्रे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, अमोल हुंबे, महेश लोंढे, संजय छजलानी, रवींद्र लालबोंद्रे, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, पोपट पाथरे, पांडुरंग घोरपडे, अविनाश भिंगारदिवे, बाळासाहेब पठारे, पवन कुमटकर, विजय चव्हाण, राजेंद्र घोरपडे, अर्जुन कार्ले, परेश खराडे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, शिवसेनेत स्व. आनंद दिघे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य मिळाले. दररोज हजारो लोक स्व. दिघे यांच्या कार्यालयात प्रश्‍न घेऊन यायचे व ते सोडवण्याचे काम अहोरात्र करत होते. शेवटच्या श्‍वासापर्यंत जनतेचे सेवक म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांचे विचार घेऊन शिवसेना वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.


सचिन जाधव म्हणाले की, समाजाच्या कल्याणासाठी स्व. आनंद दिघे यांचा वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहे. त्यांच्या विचाराने जनकल्याणकारी योजना राबवून समाजातील शेवटच्या घटकांना आधार देण्याचे काम करत आहे. स्व. दिघे यांनी सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी जीवन जगले. अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले व दुर्बल उपेक्षित घटकांना आधार दिला. शिवसैनिकांना वाघाप्रमाणे जगायला त्यांनी शिकवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *