आदिवासी समाजासाठी केलेल्या कार्याची दखल
नगर (प्रतिनिधी)- आदिवासी समाजासाठी निस्वार्थपणे सुरु असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जगन्नाथ गोविंदा सावळे यांना आदिवासी समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रगतशील लेखक संघ आणि आदिवासी समाज बांधावद्वारा राजूर (ता. अकोले) येथे पहिले राजस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. या संमेलनात सावळे यांना राकेश वानखेडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या संमेलनाप्रसंगी विद्यार्थी आणि आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी आदिवासींच्या पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या बांधवांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील रंगले होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी आयुक्त वसंत पिचड, डॉ. बापू चंदनशिवे, साहित्यिक संजय दोबाडे, दिगंबर नवाळी, तानाजी सावळे, राजू ठोकळ, सुरेखा लेंभे, सतीश लेंभे, भोये, रवि बुधर आदी उपस्थित होते.
जगन्नाथ सावळे हे शहरातील न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात कार्यालयीन अधीक्षक या पदावर कार्यरत आहे. तर ते आदिवासी समाजाच्या विकासात्मक कार्यासाठी योगदान देत आहेत. आदिवासी समाजातील युवक-युवतींना मार्गदर्शन करुन त्यांना दिशा देण्याचे कार्य करत असून, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आदिवासी समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कारा बद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्वासराव आठरे, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, संचालक डॉ. भास्कर झावरे, आदिवासी सामाजीक सेवाभावी संस्थेचे शिवानंद भांगरे, दिनकर भांगरे, कविराज बोटे, हिरारामण पोपेरे, संजय गंभीरे, विजय सावळे, बाळकृष्ण धिंदळे, भरत साबळे, डॉ. शर्मिला देशमुख, डॉ. सोमनाथ, डॉ. माधुरी नंदकर, किसन साबळे, भरत साबळे, ज्योती भांगरे, हनुमंत सोनवणे, दामू शेळके, काळू भांगरे, काशिनाथ परते, प्रा. भरत डगळे, अंजली सावळे, मेचकर, सुपे, पोटकुले, ज्ञानदेव मुकणे, संजय गंभिरे यांनी अभिनंदन केले. पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.