कोल्हापूरला खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होणार गौरव
नगर (प्रतिनिधी)- येथील साहित्यिक तथा समाजसेवक त्र्यंबकराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या साहित्य आणि समाजसेवाकार्याची दखल घेऊन त्यांना दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक दिपक लोंढे यांनी देशमुख यांच्या पुरस्काराची घोषणा केली.
केडगांव येथील टी. एस. उर्फ बाळासाहेब देशमुख यांनी स्वलिखित केलेल्या, श्री क्षेत्र मांडवगण आणि सिद्धेश्वर दर्शन, आबा मास्टर, द माऊंटन मॅन या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांचा तथा त्यांच्या साहित्यसेवेच्या भरीव कामगिरीची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
शारदा वृद्धसेवाश्रम सांगली-कोल्हापूर आयोजित 18 जानेवारी शाहू स्मारक, दसरा चौक कोल्हापूर येथे पुरस्कार प्रदान सोहळ्यात, खासदार तथा कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि समाजकल्याण पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्या हस्ते त्यांना सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमास जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ ॲण्ड केअर ट्रस्ट, मुंबईचे संस्थापक हरखचंद सावलासर, हृदय प्रकाशन कोल्हापूरचे प्रा. चंद्रकांत निकाडे, युवा व्याख्याते युवराज पाटील, लेखक, दिग्दर्शक अमर देवकर, समाजसेविका शारदा लोंढे, काव्यसम्राज्ञी संध्या भांगरे उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन दीपस्तंभ शैक्षणिक संस्था, कोल्हापूरचे संस्थापक देवसर यांनी केले आहे. देशमुख यांना यापूर्वी देखील विविध पुरस्कार मिळाले असून, हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. सुदर्शन धस, जयद्रथ खाकाळ, अनिता काळे, माजी नगरसेवक अमोल येवले, साईबाबा फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित कातोरे, डॉ. मुकुंद शेवगांवकर, राजेंद्र घोडके, योगेश गुंड, डॉ. जयप्रकाश घुमटकर, प्रा.घ.ना. पांचाळ, नाना डोंगरे, लेखक गोकुळ गायकवाड, पोपटराव काळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
