• Wed. Dec 31st, 2025

ध्येय रत्न पुरस्काराने संतोष कानडे सन्मानित

ByMirror

Dec 27, 2024

पुण्यात झाला कानडे यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव

नगर (प्रतिनिधी)- न्यू आर्टस्‌ कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते संतोष पोपटराव कानडे यांना ध्येय रत्न राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. ध्येय उद्योग समूह पुणे संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात त्यांना साहित्यिक रामचंद्र जोरवर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.


सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी ध्येय उद्योग समूहाचे संचालक लहानू सदगीर, उद्योजक संदिप थोरात, सुनील बेनके, विजय वरुडकर, सौ. सुरेखा कानडे उपस्थित होते. यापूर्वी कानडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गुणवंत सेवक पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. तर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांना समाजभूषण, सेवा रत्न, सामाजिक कार्य गौरव, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी, महाराष्ट्र भूषण अशा अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्‍वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार श्रीमती दीपलक्ष्मी म्हसे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, संचालक डॉ. भास्कर झावरे, प्रबंधक बबन साबळे, अधीक्षक राजू पाटील, जगन्नाथ सावळे, न्यू आर्टस्‌ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *