खान यांनी फुलांचा व्यवसाय सचोटी व प्रामाणिकपणे करुन आपली प्रगती साधली -वसंत अगरकर
नगर (प्रतिनिधी)- फुलाचे व्यावसायिक नईम खान यांचा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्कार करण्यात आला. फुल मार्केटचे अध्यक्ष वसंत (मामा) अगरकर यांनी खान यांचा सत्कार केला. यावेळी शेखर शेलार, रईस खान, दिनेश पवार, अजय तिवारी, अयाज शेख, रियाज शेख आदी उपस्थित होते.
वसंत (मामा) अगरकर म्हणाले की, नईम खान या युवा व्यावसायिकाने फुलांचा व्यवसाय सचोटी व प्रामाणिकपणे करुन आपली प्रगती साधली आहे. शेतकरी बांधवांना देखील फुलांना चांगला भाव देऊन, त्यांना एकप्रकारे आधार देण्याचे काम करत आहे. मार्केटमध्ये ते उत्तम प्रकारे व्यवसाय करत असल्याचे त्यांनी कौतुक केले.
