बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटरची जाणून घेतली माहिती
वाहनांच्या वाढत्या प्रदुषणाला इलेक्ट्रिक वाहने सर्वोत्तम पर्याय -अरुणकाका जगताप
नगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-पुणे महामार्ग सक्कर चौक येथे नव्याने झालेल्या जीत मोटर्स चेतक शोरुमला मा. आमदार अरुणकाका जगताप यांनी भेट देऊन बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती घेतली.
शोरुमच्या वतीने जगताप यांचे स्वागत करुन सत्कार करण्यात आला. यावेळी जनक आहुजा, भावना नय्यर, अवयान नय्यर, अभिमन्यू नय्यर, शोरूमचे व्यवस्थापक रमीज शेख आदी उपस्थित होते.
अभिमन्यू नय्यर यांनी पेट्रोल, डिजेलला पर्याय व प्रदुषणमुक्त शहरासाठी बाजारपेठेत अद्यावत सोयी-सुविधांसह बजाजच्या चेतक प्रिमियम आणि चेतक अर्बन या ई स्कुटरला वाढत्या मागणीची व यामध्ये असलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिली.
अरुणकाका जगताप म्हणाले की, वाहनांच्या वाढत्या प्रदुषणाला इलेक्ट्रिक वाहने सर्वोत्तम पर्याय आहे. दिवसंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत असून, इंधनाचे दर देखील गगनाला भिडत आहे. सर्वसामान्यांना कामानिमित्त ई स्कुटर परवडणारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.