• Tue. Nov 4th, 2025

नवरात्र उत्सवानिमित्त शहरात 6 ऑक्टोबरला दांडिया नाईटचे आयोजन

ByMirror

Oct 4, 2024

रंगणार दांडिया व डान्स स्पर्धा

जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटचे रविवारी (दि.6 ऑक्टोबर) संध्याकाळी टिळकरोड येथील नंदनवन लॉन येथे आयोजन करण्यात आले आहे. या दांडिया नाईटमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिव्हाळा ग्रुपच्या अध्यक्षा अल्पना कासवा व सविता काळे यांनी केले आहे.


महिलांनी एकत्र येऊन जिव्हाळा ग्रुपची मुहुर्तमेढ रोवली. या ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात येत आहे. तर विविध सण-उत्सवात महिलांना एक व्यासपीठ निर्माण करुन देण्यासाठी ग्रुपचे कार्य सुरु आहे. या ग्रुपमध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला जोडल्या गेल्या आहेत. या दांडिया नाईटच्या कार्यक्रमात नवरात्रीनिमित्त दुर्गा पूजा व विविध स्पर्धा रंगणार असल्याची माहिती अल्पना कासवा यांनी दिली.


उद्घाटन सोहळ्यासाठी यावेळी युवा उद्योजक राजेश भंडारी, तेजस गांधी, डॉ. अमोल जाधव, मालाबारचे देवेंद्र, सुविधा संतोष, सागर गुरव, शुभम कटारिया, विशाल लाहोटी, शुभम कटारिया आदी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये मिस्टर जिव्हाळा, मिस जिव्हाळा, बेस्ट सोलो डान्सर, बेस्ट कपल डान्स, बेस्ट ड्रेसअप (महिला व पुरुष), बेस्ट ग्रुप डान्स (महिला व लहान मुले), बेस्ट कपल, बेस्ट ड्रेसअप, बेस्ट किड्स डान्सरचे आकर्षक सोने व चांदीचे बक्षिस देण्यात येणार आहे. या दांडिया नाईटचे वैशिष्टये म्हणजे नॉन स्टॉप म्युझिक लाईट, डीजे, एलईडी वॉल स्टेज राहणार आहे. तसेच दहा भाग्यवान विजेत्यांना कुपनच्या लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे दिले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी अल्पना कासवा 9420343612 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *