विकासात्मक दृष्टीकोन समोर ठेऊन प्रभागात विकास कामे सुरु -पै. मनोज लोंढे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील टांगे गल्ली येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मा. नगरसेवक पै. सुभाष लोंढे यांच्या प्रयत्नातून मार्गी लावण्यात आले. नुकतेच या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ पै. मनोज सुभाष लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुरज शिंदे, शुभम दसरे, उमेश चेन्नूर, गणेश चेन्नूर, सुनील गायकवाड, अमोल बुरगुल, हिरालाल कोक्कुल, नेहल बिंगी, सार्थक दुर्गे, प्रमिला बिंगी, नरसुबाई चेन्नूर, सोनाली दुडगू, विजया दारकुंडे, राधाबाई गोने, सुनील हरबा आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पै. मनोज लोंढे म्हणाले की, प्रभाग 13 मध्ये नगरसेवक पै. सुभाष लोंढे यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांनी विकास कामे केली. नागरिकांना सोयी-सुविधा देण्याचा विकासात्मक दृष्टीकोन समोर ठेऊन प्रभागात विकास कामे सुरु आहेत. प्रभाग समस्यामुक्त करण्यासाठी त्यांचे कार्य सुरु असून, विविध विकास कामांसह प्रलंबीत प्रश्न सोडविण्यात ते योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेश चेन्नुर म्हणाले की, नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम पै. सुभाष लोंढे यांच्या माध्यमातून होत आहे. काम करताना त्याचा दर्जा देखील उत्तम राखला जात असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक महिलांनी घरापर्यंत सिमेंट रस्ते उपलब्ध होत असल्याने पावसाळ्यात चिखलाच्या त्रासपासून मुक्ती मिळणार आहे. गल्लीतील रस्ते चकाचक झाल्याचा आनंद असल्याची भावना व्यक्त केल्या. रस्त्यांचा प्रश्न सोडविल्याबद्दल नागरिकांच्या वतीने नगरसेवक पै. सुभाष लोंढे यांचे आभार मानण्यात आले.