पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघाली मिरवणुक
लक्ष्मीआई मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे लक्ष्मीआईची यात्रा उत्साहात पार पडली. गावातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. गावातील विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन नैवैद्य दाखविण्यात आले.

गावातील लक्ष्मीआई मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. गावातील उद्योजक राजेंद्र काशिनाथ शिंदे यांनी मंदिर उभारणीसाठी पाच लाख रुपये दिले असून त्यांचा किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी सत्कार केला.
यावेळी जालिंदर आतकर, राजू शेख, रीना बोडखे, रंम्बा वाखारे, वीणा बोडखे, सखुबाई पाचारणे, ऋषिकेश बोडखे, अंकुश आतकर, सचिन कापसे, भाऊसाहेब पाचरणे, कृष्णा डोंगरे, पर्बती कदम, विकास जाधव, शिवतेज कापसे, बाबुभाई शेख, भाऊराव जाधव, संदीप डोंगरे आदी उपस्थित होते.
सालाबाद प्रमाणे गावात दरवर्षी लक्ष्मीआईची यात्रा उत्साहात साजरी केली जाते. पारंपारिक वाद्यांचे गजर व लक्षीमातेच्या जयघोषाने परिसर दणाणून निघाला. लक्ष्मीमातेच्या दर्शनासाठी भाविकांसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.