अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र स्टेट वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने 15 वर्षाखालील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सराव शिबिर व निवड चाचणीसाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या निवड समितीने सिध्देश्वर आबासाहेब देशमुख व कृष्णराज गुरुदत्त टेमकर या दोन खेळाडूंची निवड केली आहे.
सोमवार (दि.15 जुलै) पासून मुंबईत सराव शिबिर व निवड चाचणीला प्रारंभ होणार आहे. या खेळाडूंची निवड जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे राजेंद्र पाटोळे, व्हिक्टर जोसेफ, व जेव्हिअर स्वामी यांनी केली. सिध्देश्वर हा आयकॉन शाळेचा विद्यार्थी असून, इयत्ता नववीत शिकत आहे. त्याला शाळेतील क्रीडा प्रशिक्षक जोनाथन जोसेफ व पल्लवी सैंदाणे यांचे मार्गदशन लाभले. तर कृष्णराज हा आठरे पाटील पब्लिक स्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी असून, त्याला शाळेचे क्रीडा शिक्षक संदीप दरंदले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या दोन्ही खेळाडूंना पुढील वाटचालीस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदीया, वरीष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालीद सय्यद, सचिव रौनप फर्नांडीस, सहसचिव प्रदीपकुमार जाधव, खजिनदार राणाशेठ परमार, रमेश परदेशी, सय्यद सादीक, रणबीरसिंग परमार, पल्लवी सैंदाणे यांनी शुभेच्छा दिल्या. या शिबिर व निवड चाचणीतून त्यांची महाराष्ट्र संघात निवड झाल्यास रामकृष्ण मिशन आश्रम नारायणपूर (छत्तीसगड) येथे 27 जुलै ते 12 ॲागस्ट दरम्यान होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेत ते महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.