• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

आमदार जगताप यांच्या प्रयत्नाने रामवाडी झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते चकाकणार

ByMirror

Jul 4, 2024
आमदार जगताप यांच्या प्रयत्नाने रामवाडी झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते चकाकणार

अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

रामवाडीचा विकासात्मक कामांनी कायापालट झाला -निलेश म्हसे पाटील

अहमदनगर (प्रतिनिधी)- विकासापासून वंचित राहिलेल्या रामवाडी झोपडपट्टीतील विकास कामे आमदार संग्राम जगताप यांनी मार्गी लावली. सर्वसामान्य कष्टकरी वर्गातील नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम त्यांनी केले. महत्त्वाचा पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाईन व रस्त्याचा प्रश्‍न त्यांच्या प्रयत्नाने मार्गी लागत आहे. पथदिव्यांची व्यवस्था करुन या परिसरातील अंधकार देखील दूर करण्याचे काम त्यांनी केले असून, रामवाडीचा विकासात्मक कामांनी कायापालट झाला असल्याचे मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे पाटील यांनी सांगितले.


आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाने रामवाडी येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ निलेश म्हसे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाघमारे, सतीश साळवे, अश्‍विन खुडे, किशन गायकवाड, पप्पु पाथरे, रवी साठे, राधाबाई साठे, अलका वाघचौरे, अलका साबळे, मंगल भोसले, सारिका दिवटे, सविता प्रभुणे, राकेश पाथरे, अनिकेत गायकवाड, बंटी साबळे, आकाश कांबळे, दिपक साबळे, नितीन बोरगे, राजु कांबळे, सुदामा साठे, अशोक भोसले, श्‍याम भिंगारदिवे, चंद्रकात घाटविसावे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


रामवाडी झोपडपट्टीत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. पावसाळ्यात घरासमोरच पाण्याचे साचलेले डबले व चिखलाने माखलेले रस्त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे देखील अवघड होत होते. मात्र या काँक्रिटीकरणाने झोपडपट्टीतील रस्ते आता चकाकणार आहेत. सर्वसामान्यांच्या हाकेला ओ देणारे आमदार म्हणून जगताप काम करत आहे. जिव्हाळ्याचा पाणी प्रश्‍न, ड्रेनेज लाईन व रस्त्याचा प्रश्‍न देखील सोडविण्यात आल्याने येथील नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *