• Thu. Oct 16th, 2025

शिष्यवृत्तीमध्ये श्रीराम विद्यालयाचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत

ByMirror

Jul 4, 2024

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत नगर तालुक्यातील श्रीराम विद्यालय राळेगण या विद्यालयाच्या श्रावणी संदिप लोखंडे, सायली प्रताप हराळ, सार्थक मारुती पिंपळे व ईश्‍वरी आप्पासाहेब कुलांगे या विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. शासनाच्या शिष्यवृत्तीस हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना राजेंद्र कोतकर, राजश्री जाधव, संजय भापकर, सुजय झेंडे यांचे मार्गदर्शन तसेच मुख्याध्यापिका तारका भापकर व विजय जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.


श्रीराम विद्यालयाचा मागील 17 वर्षे एस.एस.सीचा निकाल शंभर टक्के लागत आहे. ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेत सातत्याने विद्यालयाचे विद्यार्थी शिष्यवृतीस पात्र ठरत आहेत. क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यालयाने झेप घेतली असून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याचे काम होत असल्याने शाळेचे कामकाज आदर्शवत व दिशादर्शक असल्याचे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर पाटील भापकर यांनी व्यक्त केले. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मा. उपसरपंच अनिल पिंपळे, सेवा सोसायटीचे चेअरमन मारुती पिंपळे, मा. ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष हराळ व शिक्षक उपस्थित होते.


यशस्वी विद्यार्थ्यांचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्‍वासराव आठरे, सहसचिव जयंतराव वाघ, खजिनदार दिपलक्ष्मी म्हसे, ज्येष्ठ विश्‍वस्त जी.डी. खानदेशे, मुकेशदादा मुळे, गावच्या सरपंच दिपालीताई भापकर, उपसरपंच कल्पना कुलांगे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किरण भापकर, मुख्याध्यापिका तारका भापकर, पै. शरद कोतकर, हरिभाऊ दरेकर, नीळकंठ मुळे, विशाल शेलार, आकाश मनवरे, रामदास साबळे, मयुर मुळे, आकांक्षा शेलार व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *