कल्याणी गदादे राज्यात सतरावी तर ओम मिसाळ सोळावा
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी शाळेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा या वर्षीही कायम राखली असून, राज्याच्या व जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत 44 विद्यार्थ्यांनी स्थान पटकाविले आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीत इयत्ता 5 वी मधील कल्याणी गदादे ही सतरावी तर इयत्ता 8 वी मधला ओम मिसाळ याने सोळावा येण्याचा बहुमान पटकाविला आहे.

या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड, पर्यवेक्षिका आशा सातपुते, पर्यवेक्षक बाळासाहेब वाव्हळ, विष्णू गिरी आदींसह मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.
इयत्ता 5 वी च्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 24 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यामध्ये कल्याणी गदादे ही राज्यात सतरावी तर जिल्ह्यात आठवी आली आहे. तसेच जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत ऋत्विक कासार, तेजल ठाणगे, श्रीअंश जोशी, मृणाल डोईफोडे, आशुतोष म्हस्के, ज्ञानेश्वर झरेकर, श्रेयश लाड, सान्वी जाधव, दुर्वा निमसे, स्वरराज चव्हाण, तनया पळसकर, स्वराज ठाणगे, सोहम रायकर, आराध्या खुळे, प्रगती चौतमाल, पुनम गुंड, अर्णव वाबळे, जिनिशा गांधी, अथर्व गडाख, अनन्या वांद्रे, आराध्या गायके, आर्यन कंठाळे, श्रीराम शिंदे यांचा समावेश आहे.
इयत्ता 8 वी च्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे 20 विद्यार्थी चमकले आहे. यामध्ये ओम मिसाळ राज्यात सोळावा तर जिल्ह्यात तिसरा आला आहे. तसेच जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्वामिनी दहातोंडे, शिवतेज शिंदे, प्राजक्ता सैंदाणे, प्रथमेश भांबरे, श्लोक कार्ले, रुद्रावर्त देशपांडे, अक्षरा भुजबळ, चैतन्य शिंदे, श्रेया कार्ले, स्वरिका जासूद, गौरी बांदल, श्रीराम ढोले, अनुजा गर्जे, गुंजन गोले, सुरज कुटे, कृष्णा जपे, धनराज शेळके, शताक्षी नगरकर, नक्षत्रा इप्पलपेल्ली यांचा समावेश आहे.
इयत्ता 5 वीच्या विद्यार्थ्यांना वैशाली मेहेर, बाळासाहेब पालवे, अतुल बोरुडे, शीतल डिमळे, अपर्णा कमलकर, मिनाताई साबळे, सविता जासूद, गणेश गायकवाड यांचे तर इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांना प्रगती बेगडे, योगिनी क्षीरसागर, राजलक्ष्मी कुलकर्णी, शिल्पा नगरकर, सुलभा कुलकर्णी, अंजली गोले, सुषमा मुदगल, वैभव पडोळे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
छायाताई फिरोदिया यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन गुणवत्ता टिकवून भवितव्य घडविण्याचे सांगितले. संस्थेचे सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.