• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

संवर्धन केलेल्या वडाच्या झाडाचे पूजन करुन वटपौर्णिमा साजरी

ByMirror

Jun 23, 2024
संवर्धन केलेल्या वडाच्या झाडाचे पूजन करुन वटपौर्णिमा साजरी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महिलांनी केली पूजा

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी दहा वर्षापूर्वी लावलेल्या वडाच्या झाडाचे पूजन करुन वटपौर्णिमा साजरी केली. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तर सात ही जन्मात हाच पती मिळो, व पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.


स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, नवनाथ विद्यालय व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मागील काही वर्षांपासून वटपौर्णिमेला महिलांच्या हस्ते वडाच्या झाडाची लागवड करण्याचा उपक्रम सातत्याने सुरु आहे. बहरलेल्या वडाच्या झाडाच्या सावलीत गृहिणींनी वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी आशाबाई ठाणगे, मंदाताई डोंगरे, प्रियंका डोंगरे-ठाणगे, कोमल ठाणगे, मंदा साळवे, मयुरी जाधव, जाईबाई गुंजाळ, विमल ठाणगे आदी महिला उपस्थित होत्या.


पै.नाना डोंगरे म्हणाले की, गाव हरित व सुंदर बनविण्यासाठी व्यापक प्रमाणात वृक्ष लागवडची गरज आहे. यासाठी लोकसहभाग आवश्‍यक असून, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड व त्याचे संवर्धन काळाची गरज बनली असल्याचे सांगून, त्यांनी वडाच्या झाडाचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व विशद केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *