• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

वारकरी संप्रदायातील खुडे महाराज व जाधव महाराज यांना पुरस्कार जाहीर

ByMirror

May 30, 2024

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने होणार सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- वारकरी संप्रदायात उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. संतोष खुडे महाराज व ह.भ.प. एकनाथ जाधव महाराज यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रविवार दि.9 जून रोजी निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात राज्यस्तरीय पाचव्या काव्य संमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. या काव्य संमेलनात पाहुण्यांच्या हस्ते खुडे व जाधव महाराज यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती काव्य संमेलनाचे आयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे व सचिव मंदाताई डोंगरे यांनी दिली.


बेनवडी (ता. कर्जत) येथील ह.भ.प. संतोष खुडे महाराज व टाकळी खातगाव (ता. नगर) येथील ह.भ.प. एकनाथ जाधव महाराज अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायात सेवा देत आहेत. विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात त्यांचे निस्वार्थपणे योगदान सुरु आहे.

या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *