• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात श्री संत सेन महाराजांची जयंती साजरी

ByMirror

May 7, 2024

संत सेन महाराजांनी भक्तीचा मार्ग दाखविला -आ. संग्राम जगताप

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सेन समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी सेन महाराजांची 724 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्री संत सेन यांच्या पादुकेचे पुजन करुन पालखीतून मिरवणुक काढण्यात आली.


नवीन टिळक रोड, माऊली सांस्कृतिक हॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्री संत सेन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मोहन फुलडाळे, रमेश बनबेरु, बाबुलाल ईणानिया, संजय टाक, नंदकिशोर टाक, मनिष फुलडाळे, अरुण खिची, मनोज फुलडाळे, विशाल फुलडाळे, वैभव ढाकणे, योगेश फुलडाळे आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, संत सेन महाराजांनी भक्तीचा मार्ग दाखविला. जीवनाचे सार्थक होण्यासाठी संत सेन महाराजांनी दाखवलेला भक्ती मार्ग स्विकारण्याची गरज आहे. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसून, त्यांचे कार्य अखंड मानव जातीसाठी आहे.

उच्च विचारसरणी व पंढरीनाथावर निष्ठा असणारे संत सेन महाराजांचे विचार समाजाला दिशा देणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्री संत सेन महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सेन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *