• Mon. Jan 26th, 2026

शहरात गॉडविन कप 9 अ साइड फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

ByMirror

Mar 24, 2024

1 एप्रिल पासून भुईकोट किल्ल्याच्या मैदानात रंगणार फुटबॉल सामने

खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिवंगत फुटबॉल खेळाडू गॉडविन डिक यांचा स्मरणार्थ फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीच्या वतीने गॉडविन कप 9 अ साइड फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 1 एप्रिलपासून भुईकोट किल्ला येथील मैदानात ही स्पर्धा रंगणार असून, खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राणाशेठ परमार, विक्टर जोसेफ व खालिद सय्यद यांनी दिली.


शहरासह जिल्ह्यातील फुटबॉलच्या विकासासाठी स्व. गॉडविन डिक यांचे मोठे योगदान आहे. या खेळाच्या प्रचार, प्रसारासाठी व नवोदित खेळाडू घडविण्यासाठी शेवटच्या क्षणा पर्यंत ते कार्यरत राहिले. त्याचे अथक परिश्रम, दूरदृष्टी, नेतृत्व आणि खेळावरील निस्सीम प्रेमामुळे शहरात फुटबॉल खेळाची चळवळ बहरली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


या फुटबॉल स्पर्धेत शहरातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा डिक कुटुंबीय आणि अहदमनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. नॉकआऊट पध्दतीने ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. विजेत्या संघास 9 हजार रुपये रोख व चषक, उपविजयी संघास 5 हजार रुपये रोख व चषक प्रदान केले जाणार आहे. संघांना 5 पर्यायांसह 9 खेळाडू (9+5=14) ठेवण्याची परवानगी आहे. रोलिंग बदलण्याची परवानगी नसून, ऑफसाइड नियम लागू होणार नाही.

सामन्याचा कालावधी प्रत्येक 30 मिनिटे असून, इतर सर्व नियम खेळासाठी लागू आहेत. 28 मार्चपूर्वी संघांनी नाव नोंदणी करणे आवश्‍यक असून, अधिक माहितीसाठी राजेश अँथनी 7030112233 व जॉय जोसेफ 9604494961 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *