• Mon. Jan 26th, 2026

फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने फुटबॉल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

ByMirror

Mar 15, 2024

शहरातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन व दर्जेदार प्रशिक्षणासाठी पुढाकार

फुटबॉल खेळाडूंना लाभ घेण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नवोदित फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन व दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल क्लबच्या वतीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून फुटबॉल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आले आहे. या प्रशिक्षण वर्गाचा फुटबॉल खेळाडूंना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


फिरोदिया शिवाजीयन्सचे नरेंद्र फिरोदिया व मनोज वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण वर्ग होणार असून, यामध्ये उच्च प्रशिक्षित फुटबॉल प्रशिक्षक खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणातून खेळाडूंमध्ये नेतृत्व व खेळाचे कौशल्ये विकसित केले जाणार आहे.


सहा वर्षावरील मुले व मुलींना या अकॅडमीत सहभागी होता येणार आहे.अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 4:30 ते 6:30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षण वर्गासाठी ग्रास ग्राउंड व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मैदान सज्ज केले जाणार आहे. खेळाडूंच्या नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी 8796858947 व 8208771795 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *