• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

केंद्राप्रमाणे राज्यातील शिक्षक, कर्मचारी यांना 4 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू व्हावा -बाबासाहेब बोडखे

ByMirror

Mar 13, 2024

शासन आदेश निर्गमीत करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य शासनाकडे मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शिक्षक, कर्मचारी यांना 1 जानेवारी 2024 पासून 4 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या वतीने राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.


या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष सुहास हिर्लेकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, कोषाध्यक्ष गणेश नाकती व माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री आणि शालेय शिक्षण व क्रीडा सचिवांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.


केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2024 पासून 4 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने एकमताने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2024 पासून 4 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करणे आवश्‍यक आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सदर लाभ मिळण्यासाठी राज्यातील कर्मचारी सुद्धा शासन निर्णयाची मोठ्या आशेने वाट पाहत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सुद्धा 1 जानेवारी 2024 पासून 4 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबतचा शासन आदेश आचारसंहितेपूर्वी निर्गमित करून सदर आर्थिक लाभ मिळवून देण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी राज्य कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *