शेतकरी कुटुंबातून आलेल्या युवकाने उभारला कोल्ड प्रेस खाद्य तेलाचा व्यवसाय; नागरिकांच्या आरोग्याला ठरतोय लाभदायी
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून व समाजाची गरज ओळखून शेतकरी कुटुंबातील युवक विनोद साळवे यांनी कोल्ड प्रेस तेलाचा यशस्वी व्यवसाय उभा करुन अनेक बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुणे येथे कॅन्सर पीडित लहान मुले, अंध-अपंग व गरजू महिलांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या एक हाथ मदतीचा कार्यक्रमात साळवे यांना अभिनेते देव झुंबरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मॉडेल फोटोग्राफर गणेश गुरव, सचिन दानााई, अभिनेत्री सोनाली खनखारे, सत्यशोधकचे बाळासाहेब बनगर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
युवा उद्योजक विनोद साळवे यांनी बाजारात भेसळयुक्त व केमिकलयुक्त तेलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असताना, दैनंदिन वापरातल्या खाद्यतेलावर पर्याय म्हणून आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या कोल्ड प्रेस तेलाच्या व्यवसायाला प्रारंभ केले. सचोटी, कष्ट, सातत्य व प्रामाणिकपणाने त्यांनी हा व्यवसाय वेगळ्या उंचीवर नेवून ठेवला आहे. शुध्द तेलाची निर्मिती करून एक प्रकारे आरोग्य सेवेचा काम साळवे करीत आहे.
जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणाहून त्यांच्या उत्पादनाला मागणी असून, या उद्योगातून अनेकांना रोजगार देखील मिळाला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, अखिल भारतीय सेनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ वनारसे, ॲड. महेश शिंदे, तनिज शेख, मेजर शेलार, ओम काळे, विशाल जगताप, अनिल साळवे, मेजर वेताळ, सिद्धांत पाटोळे, डॉ. संतोष गिऱ्हे, मेजर तुकाराम डफळ, धीरज कांबळे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.