अहमदनगर (प्रतिनिधी)- कापूरवाडी (ता. नगर) येथील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या हजरत सय्यद इसहाक शहा कादरी (रहमतुल्ला अलाहै) मिरावली पहाड दर्गा येथे भाविकांच्या सोयीसाठी रस्ता मजबुतीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नाने सदरचे काम मार्गी लावण्यात आले असून, पुणे येथील महेश शिंदे व विलास अण्णा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.
मिरावली पहाडचा विकास करण्यासाठी माजी मंत्री कर्डिले यांचे मोठे योगदान राहिले आहे. पहाड परिसरात भाविकांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्याचे काम सुरु आहे. या कामामुळे मिरावली पहाडवर येणाऱ्या भाविकांची सोय होणार असल्याची माहिती खादीम ए दर्गा शफी हाजी भैय्यासाहेब जहागीरदार यांनी दिली.