सामाजिक व बँकिंग क्षेत्रातील कार्याचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अशोक नामदेव खरमाळे यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. उद्योजक बाळासाहेब शहाणे यांच्या हस्ते खरमाळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त चौथे राज्यस्तरीय काव्य संमेलनात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, शहर वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड, काव्य संमेलनाचे अध्यक्ष तथा गझलकार रज्जाक शेख, सामाजिक वनीकरणचे वन क्षेत्रपाल हेमंत उबाळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, उपसरपंच प्रमोद जाधव, डॉ. विजय जाधव आदी उपस्थित होते.
नांदगाव (ता. नगर) येथील अशोक खरमाळे यांचे विविध सामाजिक क्षेत्रात कार्य सुरु आहे. निस्वार्थ भावनेने ते सामाजिक कार्यात योगदान देत आहे. तर बँकिंग क्षेत्रात देखील त्यांचे उत्कृष्ट कार्य सुरु आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.