विविध रुग्णालयात रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप
समाजात संस्कृती जोपासून महापुरुषांचे विचार रुजविण्याचे प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड, सावेडी येथील मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चौकात भव्य स्टेजवर राजवाड्याची सजावट करुन शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा अभिवादनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी युवकांनी जय भवानी… जय शिवाजी… च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तर प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध रुग्णालयातील रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप करण्यात आले.
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. माणिक विधाते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन मदान, जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, अभिजीत खोसे, अजिंक्य बोरकर, प्रितपासिंह धुप्पड, अमित खामकर, मनोज मदान, गायत्री जोशी, शारदा पोखरकर, सागर गुंजाळ, गुड्डू खताळ, हर्षल शिरसाठ, अभिलाषा मदान, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर, अनुराधा खोसे, गजेंद्र भांडवलकर, सुमित कुलकर्णी, रोहिदास सातपुते, सुष्मा पाटील, जस्मितसिंह वधवा, तेजस खोसे, यश दुग्गल, संदीप थोरात, प्रदिप सचदेव, स्वप्निल गवळी, शिव खाडे, सचिन जगताप, सावंत छाबरा, सनी आहुजा, सागर सारडा, अक्षय पालवे, रोहित वाघ, साहिल माने, ऋषीकेश घानमोडे, कैलाश नवलानी, विक्रम वाडेकर, जयकुमार रंगलानी, वैशाली टाक, कमल कोहली, पराग म्हंकाळे, वरेंदरसिंह आनंद, अर्चना मदान आदींसह युवक, परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मोरया युवा प्रतिष्ठान समाजात संस्कृती जोपासून महापुरुषांचे विचार रुजविण्याचे कार्य करत आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी नवरात्र उत्सव, गणेशोत्सव व महापुरुषांच्या जयंती उत्सवामध्ये राबविण्यात येणारे उपक्रम दिशादर्शक आहे. सावेडी उपनगरात या प्रतिष्ठानने विद्यार्थी, महिला व युवकांना व्यासपिठ निर्माण करुन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्जुन मदान म्हणाले की, मोरया युवा प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी जोपासून कार्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन उपनगर परिसरात धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक चळवळ रुजविण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.