विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठीचा उपक्रम
वंचित घटकातील मुलांना प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- शाळा-महाविद्यालयात स्नेहसंमेलन, क्रीडा मेळावे, सहल, विविध डे साजरा होत असताना हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने निरीक्षण व बालसुधारगृह आणि बाबावाडी येथील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी हरदिनच्या वतीने पुढाकार घेऊन हा उपक्रम घेण्यात आला होता.

विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, गंगाराम मुंडे, सर्वेश सपकाळ, दीपक धाडगे, अभिजीत सपकाळ, अशोक पराते, अविनाश जाधव, ईवान सपकाळ, शोभा मुंडे, प्रांजली सपकाळ, संगीता सपकाळ आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, समाजातील आजचे विद्यार्थी उद्याचा भविष्य आहे. वंचित घटकातील मुलांना प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज आहे. सर्व शाळांमध्ये विविध उपक्रमातून विद्यार्थी आनंद लुटत असताना, या वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वेश सपकाळ यांनी वंचितांसमवेत आनंद साजरा केल्याने समाधान मिळतो. सेलिब्रेशन करण्याची पध्दत बदलत चालली असून, उपेक्षितांना केलेली मदत हेच जीवनातील समाधान असल्याचे सांगितले.