• Sun. Jul 20th, 2025

शहरातील सर्व व्यावसायिक इमारतीचे फायर ऑडिट करुन मनपाची अग्निशमक यंत्रणा सक्षम करावी

ByMirror

Feb 8, 2024

आम आदमी पार्टीची मागणी

शहरात मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच सतर्क व्हावे -प्रा. अशोक डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व व्यावसायिक इमारतीचे फायर ऑडिट करुन मनपाची अग्निशमक यंत्रणा सक्षम करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आपचे जिल्हा समन्वयक प्रा. अशोक डोंगरे, शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, दिलीप घुले, राहुल तांबे, रवी सातपुते आदी उपस्थित होते.


नुकतेच नगर-मनमाड रोड येथील व्यावसायिक इमारतीला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. भविष्याच्या दृष्टीकोनाने आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व इमारतीचे फायर ऑडिट होणे आवश्‍यक आहे. मनपा प्रशासनाने व्यावसायिक इमारतीचे फायर ऑडिट तपासणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नगर-मनमाड रोड येथील व्यवसायिक इमारतीला लागलेली आग विझवताना मनपाच्या अग्निशमक यंत्रणेकडे असलेल्या कमी गाड्या व पाण्याचा अभाव या त्रुटी जाणवल्या. अग्निशमक बंब वेळेवर पोहचले, मात्र आग विझवण्यासाठी त्या सक्षम नव्हत्या. यासाठी अग्निशमक यंत्रणा सक्षम करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.


मनपा प्रशासनाने भविष्यातील संकटे ओळखून जास्तीत जास्त नवीन अग्निशमक यंत्रणेसाठी नवीन गाड्या घ्यावा, या गाड्यांची महिन्यातून एकदा सर्व्हिसीबिलिटी तपासावी, त्यामध्ये काम करणारे मनुष्यबळ वाढवावे व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व कमर्शिअल इमारतीचे फायर ऑडिट करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.



शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. मोठ-मोठे व्यावसायिक व रहिवाशी इमारती उभ्या राहत आहे. मनपाकडे असलेली अग्निशमक यंत्रणा अद्यावत नसल्याने भविष्यात मोठी आगीची दुर्घटना झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे अशक्य होणार आहे. तर इमारतीचे फायर ऑडिट तपासणे मनपा प्रशासनाचे काम आहे. यापूर्वी देखील जिल्हा रुग्णालयालातील कक्षाला आग लागल्यानंतर सर्वांना जाग आली. शहरात मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच सतर्क होवून सर्व इमारतीचे फायर ऑडिट तपासावे. -प्रा. अशोक डोंगरे (जिल्हा समन्वयक, आम आदमी पार्टी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *