अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार, माळ गल्ली येथील दत्तात्रय बापूजी गोंधळे यांचे वृध्दापकाळाने बुधवारी (दि.7 फेब्रुवारी) सकाळी निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
चार पिढ्या एकत्र राहणारे कुटुंबाचे ते प्रमुख होते. सुभाष गोंधळे यांचे वडील तर दीपक गोंधळे यांचे ते आजोबा होते. अतिशय प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचे असल्याने सर्वांना ते सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.