पोवाडा व व्याख्यानातून उलगडणार छत्रपती शिवाजी महाराजांची कर्तृत्व व शौर्याची गाथा
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व व शौर्याची गाथा सांगणारा शाहिरांचा कार्यक्रम रंगणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे व युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे यांनी दिली.
या शाहिरी जलसा कार्यक्रमाचे प्रारंभ शिवशाहीर विक्रम अवचिते व त्यांच्या सहकलाकारांच्या रयतेचा राजा…. या शाहिरी पोवाड्यानी होणार आहे. शिव व्याख्याते अभय जावळे यांचा राजा शिवछत्रपती व धर्मवीर संभाजी महाराज यांचा धगधगता इतिहास व्याख्यान रूपाने मांडला जाणार आहे.
शिवशाहीर शांताराम वगदे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा इतिहास पोवाड्यातून सांगणार आहे. तर बाल शाहीर ओवी काळे पोवाडे सादर करणार आहे. परिवार मंगल कार्यालयात सकाळी 10 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
