• Mon. Jul 21st, 2025

केडगाव देवी परिसरातील विजेचा प्रश्‍न कायमचा सुटणार!

ByMirror

Feb 5, 2024

200 के.व्ही. चा ट्रांसफार्मर बसविण्याचे कामाला प्रारंभ

नागरिकांना मोठा दिलासा मिळणार -जालिंदर कोतकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव देवी परिसरातील विजेचा प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी 200 के.व्ही. चा ट्रांसफार्मर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांच्या हस्ते झाला. केडगाव देवी परिसराचा विस्तार झपाट्याने झाला असताना वाढलेली विजेची मागणी व कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त होते. अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याचा प्रश्‍न खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून नवीन ट्रांसफार्मर बसवून हा प्रश्‍न सोडविण्याचे काम सुरु झाले आहे.


या उद्घाटनासाठी उद्योजक जालिंदर कोतकर, नगरसेवक मनोज कोतकर, सुनील मामा कोतकर, राहुल कांबळे, गणेश नन्नवरे, महेंद्र कांबळे, इंजि. प्रसाद आंधळे, रावसाहेब मतकर, बच्चन कोतकर, श्‍याम कोतकर, सोपानराव कोतकर, मच्छिंद्र कोतकर, भूषण गुंड, अशोक कराळे, अनिल ठुबे, सुमित लोंढे, सागर सातपुते, गणेश सातपुते, पोपट ठुबे, सुरज शेळके, पोपट कराळे, महेश कोतकर, केतन भंडारी, योगेश कोतकर, सुरेश झरेकर, नवनाथ कोतकर, जमदाडे सर, सोपानराव कोतकर, किशोर कोतकर, उमेश कोतकर यांच्यासह विद्युत महावितरणचे कर्मचारी व केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जालिंदर कोतकर म्हणाले की, केडगावमध्ये शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. शहराचा सर्वात मोठा उपनगर म्हणून केडगावचा विस्तार सुरु आहे. केडगाव देवी परिसरात देखील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यांचा विजेचा मोठा प्रश्‍न भेडसावत होता.

कमी दाबाने वीज पुरवठा व अवेळी वीज खंडित होत होती. हा प्रश्‍न खासदार डॉ. विखे यांच्या प्रयत्नाने सोडविण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून, उन्हाळ्यात त्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *