• Sat. Jul 19th, 2025

बालघर प्रकल्पातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप

ByMirror

Jan 30, 2024

औषध प्रतिनिधींना हेल्मेटची भेट

अहमदनगर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने अहमदनगर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने तपोवन रोडच्या बालघर प्रकल्पातील वंचित, अनाथ व निराधार मुलांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. तर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने औषध प्रतिनिधींना हेल्मेट वाटप करण्यात आले.


अखिल भारतीय औषधे विक्रेता संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या प्रेरणेने जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी केमिस्ट संघटनेचे उपाध्यक्ष भरत सुपेकर, उपसचिव महेश आठरे, खजिनदार मनोज खेडकर, राजेंद्र बलदोटा, संचालक कमलेश गुंदेचा, अनिल क्षीरसागर, अविनाश सांळुके, शरद डोंगरे, मनमोहन बहुरूपी, युराज गुंजाळ, निलेश शर्मा, प्रकाश खेडकर, पराग झावरे, श्रीनिवास बोडखे, किरण रासकर, सिकंदर पाल, ज्ञानदेव यादव आदी उपस्थित होते.


भरत सुपेकर म्हणाले की, भावी पिढी मोबाईलमध्ये अडकत असताना त्यांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तर समाजातील वंचित व निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देऊन जीवनात उभे करणे प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. खेळ व शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास होणार आहे. या भावनेने सातत्याने जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


राजेंद्र बलदोटा म्हणाले की, केमिस्ट असोसिएशनने नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे. अखिल भारतीय औषधे विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व केमिस्ट बांधव फक्त व्यवसाय पुरते मर्यादीत न राहता सामाजिक योगदान देत आहे. समाजाचे काहीतरी देणे लागते याच भावनेतून संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *