• Mon. Jul 21st, 2025

आमी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

ByMirror

Jan 14, 2024

ऑक्सीजन प्रकल्प व कंपन्यासाठी एका हॉल उभारणीचा प्रस्ताव

अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्योजक व कंपन्यांच्या प्रश्‍नावर कार्यरत असलेल्या आमी संघटनेची अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेप्रसंगी उपाध्यक्ष महेश इंदाणी, जनरल सचिव सागर निंबाळकर, सचिव प्रफुल्ल पारख, चिन्मय सुखटणकर, सहसचिव सतीश गवळी, खजिनदार सुमित लोढा, राजेंद्र कटारिया आदी उपस्थित होते.


जयद्रथ खाकाळ म्हणाले की, उद्योजकांनी एकत्र येऊन कंपन्यांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी आमी संघटनेची स्थापना केली. विविध प्रश्‍नावर संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु आहे. एमआयडीसी मधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती होण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु आहे. शहराची गरज ओळखून आमीच्या माध्यमातून ऑक्सीजन प्रकल्प सुरु होत असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेच्या माध्यमातून कार्य करताना सर्वांची साथ लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. मागील वर्षीचा आढावा उपाध्यक्ष महेश इंदाणी यांनी सादर केला. आर्थिक ताळेबंदाचे वाचन खजिनदार सुमित लोढा यांनी केले. जेष्ठ उद्योजक दौलत शिंदे, राजेश जगी, मिलिंद कुलकर्णी, संजय बंदिशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


या बैठकीत सर्वांच्या संमतीने दोन ते तीन महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. खाकाळ यांच्या संकल्पनेतून आमी संघटनेच्या वतीने कंपन्यासाठी एका हॉल उभारणीचा ठराव बैठकीत घेण्यात आला. या हॉलसाठी निधी देणाऱ्याचे नाव हॉलला दिले जाणार असल्याचे स्पष्ट करुन यासाठी पुढाकार घेण्याचे उद्योजकांना आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *