वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विविध कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेसह स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
विठ्ठलरावं वाडगे व रुक्मिणीताइ वाडगे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवान, सुलोचना ढवान, सहकार्यवाह मुरलीधर पवार, दत्ताजी जगताप, प्रचार्य रवींद्र चोभे, तिवारी मेजर, सुधाताई लाटे, प्रमिला कार्ले, मुख्याध्यापक संदीप भोर, मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी आदींसह सर्व शालेय शिक्षक, कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तायक्वांदो स्पर्धेत जिल्हास्तरावर सुवर्ण, रौप्य, कास्य पदक पटकावून विभागीय स्तरावर यश प्राप्त करणाऱ्या खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. विठ्ठलरावं वाडगे यांनी सरस्वती प्राथमिक विद्यालय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह त्यांच्यातील कलागुण विकसीत करण्यासाठी राबवित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. तर सर्वच क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन स्मिता खिलारी व अनिता क्षीरसागर यांनी केले. सुरेखा कसबे यांनी आभार मानले.