शुक्रवारी येवला येथील सहविचार सभेत सहभागी होण्याचे आवाहन
शिक्षण आयुक्तांसह शिक्षक आमदारांची राहणार उपस्थिती
अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांच्यासाठी येवला येथे शुक्रवारी (दि.22 डिसेंबर) सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सहविचार सभा शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
नाशिक विभागातील सर्व जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधिक्षक उपस्थितीत राहणार असून, या सहविचार सभेत जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजे पर्यंत येवला येथील एस.एन.डी. शैक्षणिक संकुल मध्ये ही सहविचार सभा पार पडणार आहे.
यामध्ये मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांच्या विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, नगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोहकले, शहराध्यक्ष ज्ञानदेव बेरड व आमदार दराडे यांचे स्विय सहायक हरिष मुंढे व वैभव सांगळे यांनी दिली आहे.