जय हिंद फाऊंडेशनने दौलावडगाव भातोडी येथे राबविला अभिवादन कार्यक्रम
दर्गा परिसर व स्मशानभूमीच्या आवारात झाडांची लागवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपणाने लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. दौलावडगाव भातोडी (ता. नगर) येथील दर्गा परिसर व स्मशानभूमीच्या आवारात 40 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
प्रारंभी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. वृक्षारोपण अभियानाप्रसंगी दौलावडगावचे सरपंच भरत जाधव, माजी उपसरपंच नंदकुमार फसले, छबुराव फसले (नाना), ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जाधव, मीरा शेख, बाबू खान, म्हतारदेव मुळे, दादासाहेब फसले, नवनाथदादा इथापे, रावसाहेब वाणी, मयुर मुळे, लियाकत मेजर, ताजभाई खान प्रकाश कोहोक, जय हिंदचे शिवाजी पालवे, निळकंठ उल्हारे, रामदास बागडे, रामदास गुंड, पटेल मेजर, महादेव लबडे, बाबासाहेब बनसोडे, ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते.

भरत जाधव म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंडे हे देशाचे लोकनेते होते. त्यांच्या माध्यमातून ऊसतोड कामगार, शेतकरी व कष्टकरी कामगार यांना एकत्र करून विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. अठरापगड जातींना आधार देणारा नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. त्यांनी दुर्बल वंचित घटकाला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक योगदान न विसरता येणारे असून, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ राबविण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजी पालवे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्यांसाठी केलेल्या कार्यामुळे लोकनेता म्हणून त्यांची ओळख देशात निर्माण झाली. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ लावण्यात आलेले झाड त्यांच्या आठवणीतून सतत प्रेरणा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थांनी लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली. आभार मेजर रामदास गुंड यांनी मानले.