भक्तीला वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाल्यास निसर्ग पुन्हा बहरणार -शिवाजी पालवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या माजी सैनिकांनी श्रीक्षेत्र दगडवाडी (ता. पाथर्डी) निसर्गाने फुलवण्यासाठी वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. दगडादेवी मंदिर परिसरामध्ये वडांच्या झाडाची लागवड करण्यात आली.
या अभियानाप्रसंगी दगडवाडीचे माजी सरपंच सचिन शिंदे, माजी उपसरपंच देविदास शिंदे, सचिन शिंदे, मुरलीधर शिंदे, गुलाब शिंदे, भाऊसाहेब शिंदे, प्रविण पवार, महादेव काळे, दामोदर शिंदे, पांडुरंग शिंदे, शिवाजी शिंदे, प्रकाश शिंदे, मच्छिंद्र पवार, अंबादास शिंदे, साहेबराव काळे, अशोक तनपुरे, शरद शिंदे, जय हिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, रोहिदास पालवे, तुकाराम शिंदे, बापू शिंदे, सोपान शिंदे, भास्कर शिंदे, लाला काळे, गुलाब शिंदे आदी उपस्थित होते.
शिवाजी पालवे म्हणाले की, दगडवाडी ही राष्ट्रसंत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. भक्तीला वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाल्यास निसर्ग पुन्हा बहरणार आहे. तर निसर्गाचा समतोल साधला जाऊन बळीराजा सुखावला जाणार आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून मंदिर परिसर हिरवाईने फुलविण्याचे कार्य सुरु आहे. भविष्यात हे मंदिर परिसरात हिरवाईचे नंदनवन फुलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी सैनिक बापू शिंदे यांनी जय हिंदच्या वतीने जिल्हाभर सुरु असलेल्या वृक्षरोपण चळवळीचे कौतुक करुन लावण्यात आलेली झाडांचे संवर्धन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. आभार माजी सैनिक शिवाजी गर्जे यांनी मानले