नागरिकांना दिलेला शब्द पाळून प्रभागातील विकासात्मक कामे मार्गी लावली -सचिन जाधव
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांना दिलेला शब्द पाळून प्रभागातील विकासात्मक कामे मार्गी लावण्यात आली आहे. शहराच्या मध्य वस्तीत बाजारपेठेला लागून असलेल्या परिसरातील विकासात्मक कामे मार्गी लाऊन शहराचे रुप पालटण्याचे काम करण्यात आले असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव यांनी केले.
शहराच्या प्रभाग क्रमांक 10 मधील तेलीखुंट, शिंपी गल्ली येथे नगरसेविका अश्विनी सचिन जाधव यांच्या प्रयत्नाने रस्त्याचे काँक्रिटीकरण व ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन माजी उपमहापौर मालनताई ढोणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जाधव बोलत होते. यावेळी संजय ढोणे, भाऊ उनवणे, शोभा हुशारे, मिना चव्हाण, उषा सैंदर, वंदना राऊत, कोमल सैंदर, रेखा सैंदर, सविता सैंदर, गया कोटकर, किशोर काळे, प्रा. दिलीप कर्डिले, अनिल शिंदे, बाळासाहेब हुशारे, परशुराम सैंदर, शशीकांत शिंदे, मगनलाल गोयल, गणेश हजारे, अनिल हजारे, मयुर सैंदर, प्रशांत सुराणा, दिनेश रोहिडा आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे जाधव म्हणाले की, 2018 साली मंजूर केलेले सदर काम काही तांत्रिक अडचणीमुळे मार्गी लागले नाही. परंतू पुन्हा निधी उपलब्ध करुन काम मार्गी लावण्यात आले. बाजारपेठ लगत असलेल्या शिंपी गल्ली भागात बाहेरुन नागरिक येत असतात. शहराकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी दर्जेदार विकासकामे मार्गी लावण्यात आली आहे. नागरिकांनी टाकलेला विश्वासाला तडा जाऊ न देता, सातत्याने त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करण्यात आले आहे. येथील महत्त्वाचा पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाईन व रस्त्याचा प्रश्न सोडविण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माजी उपमहापौर मालनताई ढोणे म्हणाल्या की, शहराला विकासात्मक चालना मिळण्यासाठी रस्ते हा महत्त्वाचा घटक आहे. रस्ते झाल्यास शहरीकरण वाढते व विकासाला चालना मिळते. प्रभागात दर्जेदार रस्ते व इतर नागरी सुविधाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रभाग 10 मधील नगरसेवकांनी चांगल्या पद्धतीने कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेविका जाधव व इतर नगरसेवक जातीने लक्ष देऊन विकास कामे करत आहे. सर्वसामान्य नागरिक देखील त्यांना पाठीमागे ठामपणे उभे राहणार असून, गुणवत्तापूर्ण कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करून नगरसेवकांचे आभार मानले. जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न, ड्रेनेज लाईन व रस्त्याचा प्रश्न सोडविल्याने शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जाधव यांचा यावेळी नागरी सत्कार करण्यात आला.