विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांचा होणार सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र संलग्न जय युवा अकॅडमी व जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्याच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवामध्ये समाजातील विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य, उद्योजक, कृषी, आरोग्य, धार्मिक, विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समाजात विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणारे व प्रसिध्दी झोतापासून लांब असलेल्या व्यक्तींचे समाजकार्य समाजापुढे घेऊन जाऊन त्यांच्या कार्याचा सन्मान होण्यासाठी सावित्री ज्योती गौरव पुरस्कार दिले जाणार आहेत. 11 जानेवारी 2024 रोजी गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात होणाऱ्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सेमी पैठणी साडी, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
इच्छुक व्यक्तींनी दोन पासपोर्ट फोटोसह आपल्या कार्याचा परिचय थोडक्यात ॲड. महेश शिंदे, पावन गणपती मंदिरा शेजारी, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे टांगे गल्ली, अहमदनगर या पत्त्यावर 25 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सावित्री ज्योती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी गौरव समितीचे ॲड. प्रशांत साळुंके, पोपट बनकर, शिवाजी नवले, प्रा. सुनील मतकर, मेजर भीमराव उल्हारे, दिनेश शिंदे, सचिन गुलदगड, सलीम सय्यद, रावसाहेब मगर, इसाभाई शेख, डॉ. अमोल बागुल, बाळासाहेब पाटोळे, रावसाहेब काळे, आरती शिंदे, सुहास सोनवणे आदी प्रयत्नशील आहेत. अधिक माहितीसाठी 9004722330 या नंबरवर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.